Home > Politics > "…म्हणून मी लोकप्रिय मुख्यमंत्री" उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

"…म्हणून मी लोकप्रिय मुख्यमंत्री" उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

…म्हणून मी लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
X

"माझे महापालिकेतील आणि सरकारमधील सहकारी भक्कमपणे काम करत असल्याने मी लोकप्रिय मुख्यमंत्री ठरतो आहे, त्यांची साथ असल्याने मुंबईचे कौतुक जागतिक स्तरावर होते आहे. मी त्यांना नम्रपणे नमस्कार करतो. पुढच्या कोणत्याही कामासाठी जिथे सरकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे ते देण्याचे मी वचन देतो" या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा जास्त सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे उपलब्ध होणार आहे, या सुविधेचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री राज्यातील जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत सुरूवात केली. गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम केले तर लोक आपल्याशी गोड राहतील आणि आपल्या पाठीशी राहतील, हा गोडवा अनंत काळासाठी टिकून राहील, असे सांगत मुंबई महापालिका प्रशासनाचे कौतुक केले. शासकीय, प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतू त्याला छेद देणारा आजचा उपक्रम आहे, असेही ते म्हणाले. मत मागतांना वाकणारी, झुकलेली माणसं मत मिळाल्यानंतर ताठ होतात पण ज्यांना लोकांसाठी काम करायचे असते ती नेहमीच विनम्र असतात, असा टोला देखील त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे.

तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही. मुंबई महापालिका तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी महापालिकेने आतापर्यंत घेतलेल्या मोठ्या निर्णयांचा उल्लेख केला. वर्षाची सुरुवात खुप चांगली झाली. ५०० चौ.फुटाच्या घरकुलावरील घरपट्टी माफ करणे, कोस्टलरोडचा मावळाने पूर्ण केलेला बोगदा आणि मुंबईकरांना ८० सुविधा बोटाच्या टीपेवर मिळणे, ही सगळी चांगली कामे आम्ही करत आहोत, जनतेच्या सेवेसाठी काम करतांना महापालिका लपवाछपवी करत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्वत: काही करायचं नाही पण महापालिका काय करते हा प्रश्न काहीजण नेहमी उपस्थित करतात, असा टोला विरोधकांना लगावला. "माझे महापालिकेतील आणि सरकारमधील सहकारी भक्कमपणे काम करत असल्याने मी लोकप्रिय मुख्यमंत्री ठरलो आहे, त्यांची साथ असल्याने मुंबईचे कौतुक जागतिक स्तरावर होत आहे. मी त्यांना नम्रपणे नमस्कार करतो आणि पुढच्या कोणत्याही कामासाठी जिथे सरकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे ते देण्याचे मी वचन देतो" असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Updated : 14 Jan 2022 7:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top