Home > Politics > MPSC चा प्रश्न निवडणूक आयोगाकडे ... मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून राष्ट्रवादीचा शिंदेंवर निशाणा

MPSC चा प्रश्न निवडणूक आयोगाकडे ... मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून राष्ट्रवादीचा शिंदेंवर निशाणा

MPSC  चा प्रश्न निवडणूक आयोगाकडे ... मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून राष्ट्रवादीचा शिंदेंवर निशाणा
X

MPSC( महाराष्ट्र लोकसेवा अयोग ) विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भारतीय लोकसेवा आयोगाऐवजी, निवडणूक आयोगाकडे प्रश्न मांडला आहे, असं वक्तव्य केलं त्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार टीका होत आहे.

MPSC विद्यार्थ्यांचा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आहे. विविध राजकीय पक्षाचे नेते या आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत, तसेच आंदोलंनाला पाठींबाही देत आहेत. राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनीं काल रात्री उशिरा या विद्यार्थ्यांची भेट घेत या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर माध्यमांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संवाद साधला त्यावर प्रतिक्रिया देतांना , " शिंदे लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोगावर बोलल्याने, मुख्यमंत्र्यांना नक्की काय म्हणायचं होत हा संभ्रम निर्माण झाला, शिंदेंच्या या वक्तव्याचा विडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. राष्ट्रवादी ने हा विडिओ पोस्ट केला आहे.

एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?

“एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मी स्वतः बोललो. जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली, तिच भूमिका सरकारची देखील आहे. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या दोन पद्धतीबाबत काही सूचना आल्या आहेत. २०२५ पासून जी नवी पद्धत सुरु करण्यात येणार होती, त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिले असून त्यांना कळवले आहे. निवडणूक आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेबाबत सरकार सहमत असून निवडणूक आयोगाने देखील तशाच प्रकारचा निर्णय घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे.” वृत्तावाहिनींच्या प्रतिनिधींशी बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रवादीचीआक्रमक भूमिका

“यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं…असं म्हणत शिंदेंच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले…”, असे खोचक ट्विट राष्ट्रवादीने केले आहे.

साहेबांनी #MPSC विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, असे चुकुन सांगितले असावे. अश्या आशयासह राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांचा विडिओ ट्विट केला आहे.

Updated : 22 Feb 2023 1:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top