Home > Politics > अखेर भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे ठरले, आगामी निवडणुका एकत्र लढणार

अखेर भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे ठरले, आगामी निवडणुका एकत्र लढणार

अखेर भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे ठरले, आगामी निवडणुका एकत्र लढणार
X

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्यासह ४० आमदारांना भाजप (BJP ) सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी चंद्रपूरमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना ( shivsena ) आणि भाजप एकत्र निवडणुका लढती, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. तसेच याआधी मिळाले नसेल त्यापेक्षा जास्त यश या सरकारला प्राप्त होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.



Updated : 2 Sep 2022 12:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top