Home > Politics > रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना प्रतिटोला

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना प्रतिटोला

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना प्रतिटोला
X

`काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावल्यानंतर तत्काळ मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर देत `रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला,असा प्रतिटोला दिला आहे.

१० दिवसांच्या राजकीय घडामोडींनंतर सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने काल विधानसभेत १६४ आमदारांच्या भक्कम पाठिंब्यावर विश्वासदर्शक ठराव जिंकला. अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. तब्बल पावणे दोन तासांच्या भाषणात त्यांनी सत्तांतराचं नाट्य कसं घडलं, हे सांगितलं होतं. यामधे त्यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली होता.

या टिकेला उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी शिंदे-फडणवीसांना आज झालेल्या पत्रकार परीषदेत टोमणे लगावले.काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील माहिती नाही, असाही तिरकस बाणही त्यांनी फडणवीसांवर सोडला होता.

या टीकेला ट्विटकरुन प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!! असं म्हटलं आहे.


एकंदरीत शिवेसना शिंदे गट आणि ठाकरे गटात विधीमंडळ आणि न्यायालयीन लढाई सुरु असताना पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी उध्दव ठाकरे सक्रीय झाले आहे. या राजकीय टिकाटिप्पनीचा संघर्ष कुठे जाऊत पोहोचतोय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 5 July 2022 1:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top