Home > Politics > विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी, धक्काबुक्कीचा आरोप

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी, धक्काबुक्कीचा आरोप

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले. यावेळी धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी, धक्काबुक्कीचा आरोप
X

विधिमंडळ अधिवेशनात बुधवारी विरोधक आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्ये विधानभवन परिसरात जोरदारा खडाजंगी झाली. यामध्ये धक्काबुक्की देखील करण्यात आल्याचा आरोप झाला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी शिंदे गटातील आमदारांविरोधात बॅनर आणि घोषणाबाजी सुरू ठेवली होती. याला उत्तर म्हणून शिंदे गटातील आमदारांनी बुधवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात बॅनर झळकावले आणि घोषणाबाजी केली.

त्यानंतर तिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार आल्यानंतर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी वाढली. यानंतर हा वाद टोकाला गेला आणि दोन्ही बाजूच्या आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात बोलताना आमच्या घोषणाबाजीमुळे घाबरलेल्या सत्ताधारी आमदारांनी हा प्रकार केल्याची टीका केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी शिविगाळ कऱण्यात आल्याचा आरोप मिटकरी यांनी केला तर मिटकरी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप महेश शिंदे यांनी केला आहे.

विरोधकांनी एवढे दिवस आमच्या विरोधात घोषणाबाजी केली पण आम्ही कधी विरोध केला नाही, मग आता आमच्या घोषणाबाजीला विरोधक येऊन आक्षेप का घेत आहेत, असा सवाल शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी उपस्थित केला.

Updated : 24 Aug 2022 7:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top