Home > Politics > अँटी चेंबर मध्ये काय घडलं? आव्हाड - चित्रा वाघ यांच्यात ट्वीटर वॉर

अँटी चेंबर मध्ये काय घडलं? आव्हाड - चित्रा वाघ यांच्यात ट्वीटर वॉर

जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत शिवी दिल्याचा दावा करत चित्रा वाघ यांनी टीका केली होती. या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून उत्तर दिले आहे.

अँटी चेंबर मध्ये काय घडलं?  आव्हाड - चित्रा वाघ यांच्यात ट्वीटर वॉर
X

गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. त्यातच चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत टीका केल्याचं ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटला उत्तर देतांना जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्या ट्वीटला रिट्विट करून म्हटले आहे की, ताई मी कुठली शिवी दिली नाही. मला फक्त मम्मी कुणाची हे तोंड उघडायला लावू नका. मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे. तुम्हारे शिशे के घर पे हम पत्थर मार सकते है. हमाम में सब नंगे है. BA पूर्आर्मस्ट्राँग आठवत असेल ना. यापुढे स्वभावाप्रमाणे वागीन. अँटी चेंबरमधले ‘विनोद’ आता बस. यामध्ये विनोद शब्दावर जोर दिला आहे.

आपण खूप खालच्या पातळीवर जाऊन बोलता. माझा स्वभाव आपल्याला माहिती आहे. मी सहन करतो. बहिणीला सांभाळून घेत आलो. पण, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिला आहे.

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?

चित्रा वाघ यांनी ट्वीट करून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. त्यामध्ये चित्रा वाघ म्हणाल्या, सत्ता गेली की महाविकास आघाडीच्या नेत्यांची मतीही गेली. आजकाल महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झाला आहे की, त्यांचा जीभेवरही ताबा राहिलेला नाही. पत्रकार परिषदेत जाहीररित्या शिवीगाळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणं सडत चाललाय. अशा विकृतींना वेळीच आवर घाला आणि यांना येरवड्याच्या रूग्णालयात दाखल करा, अशी टीका चित्रा वाघ यांनी आव्हाड यांच्यावर केली होती. त्याला आव्हाड यांनी उत्तर दिले आहे.

Updated : 9 Jun 2023 3:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top