Home > Politics > चिपी विमानतळाचा खरा शिल्पकार कोण ?

चिपी विमानतळाचा खरा शिल्पकार कोण ?

चिपी विमानतळाचा खरा शिल्पकार कोण ?
X

चिपी विमानतळ... श्रेय नेमकं कुणाचं? अशा बातम्या तुम्ही दिवसभर टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावर पाहिल्या असतील... परंतु या राजकीय श्रेय वादाच्या कलगीतुऱ्यात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच जुंपली पाहायला मिळाली.

सिंधुदुर्गमध्ये चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थितीत होते. यावेळी दोघांनीही एकमेकांवर जोरदार टिका केल्या. यावरून राजकीय श्रेयवादाच्या लढाई सोबत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यामधील वाद पुन्हा एकादा एकाच मंचावरून पाहायला मिळाला...

दरम्यान या राजकीय श्रेयवादाच्या लढाईत चिपी विमानतळाचा खरा शिल्पकार कोण? कुणी रोवली चिपी विमानतळाची मुहुर्तमेढ जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ... चिपी विमानतळासंदर्भात राजकीय श्रेयवाद जोरदार पाहायला मिळत असताना शिंदे कुटुंबियांनी या विमानतळाच्या कामानिमित्त एक वर्तुळ पूर्ण केलं आहे.

१९९४ साली तत्कालीन खासदार सुधीर सावंत आणि आजचे नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील देशाचे तत्कालीन हवाई मंत्री माधवराव शिंदे यांनी चिपी विमानतळाची मूहूर्तमेढ केली होती.

तत्कालीन केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांनी सिंधुदुर्ग परिसरातील पाहणी स्वत: हवाई मार्गाने करत सर्वेक्षणाचा आदेश दिला होता. ही पार्श्वभूमी पाहता... तब्ब्ल २७ वर्षांनी या विमानतळाचं काम पूर्ण झालेलं आहे... विशेष बाब म्हणजे सिंधुदुर्गात विमानतळ बांधणीसाठी जागेची पाहणी करून आदेश देणाऱ्या माधवराव शिंदे यांचे पुत्र केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या मोस्ट चर्चेत असलेल्या विमानतळाचं उद्घाटन केलं. यामुळे वडिलांनी परवानगी दिलेल्या विमानतळाचं उद्घाटन मुलाने केल्यानं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे.


Updated : 10 Oct 2021 2:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top