News Update
Home > Politics > ...अन्यथा येवला येथे संपूर्ण लॉकडाऊन लावावे लागेल- पालकमंत्री छगन भुजबळ

...अन्यथा येवला येथे संपूर्ण लॉकडाऊन लावावे लागेल- पालकमंत्री छगन भुजबळ

...अन्यथा येवला येथे संपूर्ण लॉकडाऊन लावावे लागेल- पालकमंत्री छगन भुजबळ
X

येवला : येवला परिसरात वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येबाबत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी चिंता व्यक्त करत, नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळले नाही तर नाविलाज म्हणून संपूर्ण लॉकडाऊन करावं लागेल असा इशारा दिला आहे.

येवला येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान नागरिकांना वारंवार प्रशासनाकडून कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत, लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे मात्र, काही नागरिक नियम पाळत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागेल असं म्हटलं आहे. सोबतच रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत पत्रकारांनी विचारले असता मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने सर्वत्रच रस्त्यांनी दुरवस्था झाली असून लवकरच रस्त्याबाबत कॅबिनेटच्या बैठकीत प्रश्न मांडणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

दरम्यान पावसामुळे शेतीचे , शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे गरजेचे आहे, याबाबत देखील कॅबिनेट बैठकीत प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Updated : 10 Oct 2021 11:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top