Home > Politics > नाना पटोले यांनाच लंपी आजार झालाय, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

नाना पटोले यांनाच लंपी आजार झालाय, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

नरेंद्र मोदी यांनी परदेशातून चित्ते आणल्यानेच देशात लंपी आजार पसल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. त्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नाना पटोले यांनाच लंपी आजार झालाय, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियातून देशात चित्ते आणले. याची देशभरात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. तसेच चित्त्यांवरून नाना पटोले यांनी टीका करताना म्हटले की, मोदींनी नायजेरियावरून चित्ते आणले. चित्त्यांच्या अंगावर ज्याप्रमाणे ठिपके आहेत. त्याप्रमाणे गायींना लंपी आजार होत आहे. हा आजार पंतप्रधान मोदी यांनी चित्ते आणल्यामुळे होत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. त्यावरून बोलताना नाना पटोले यांनाच लंपी आजार झाल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

देशात लंपी आजारामुळे हजारो जनावरांचा मृत्या झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच नाना पटोले पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियातून चित्ते आणले. गायींना होणारा लंपी आजारही नायजेरियातून आला आहे. चित्त्यांच्या अंगावर असलेल्या ठिपक्यासारखेच ठिपके गायीच्या अंगावर येत आहेत. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठीच विदेशातून चित्ते आणल्याचा दावा नाना पटोले यांनी केला होता. त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलून माध्यमांमध्ये प्रसिध्दी मिळवण्यासाठीच नाना पटोले अशा प्रकारची विधाने करतात. राहुल गांधी यांच्या जवळ जाण्यासाठी आणि आपले प्रदेशाध्यक्षपद टिकवण्यासाठी नाना पटोले अशा प्रकारे विधाने करतात. नाना पटोले यांना लंपी आजार झाला आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांना सल्ला घ्यावा, अशी टिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते नागपुर येथे बोलत होते.




Updated : 4 Oct 2022 5:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top