Home > Politics > 'शिवसेना,राष्ट्रवादीला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही' ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात

'शिवसेना,राष्ट्रवादीला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही' ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात

‘शिवसेना,राष्ट्रवादीला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही’ असं त्यांच्याच सरकारमधील एका पक्षाचं म्हणण आहे असं म्हणत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा सरकारवर घणाघात

शिवसेना,राष्ट्रवादीला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात
X

मुंबई : "महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही, त्यांच्याच सरकारमधील एका पक्षातील नेत्याचा हा आरोप आहे" असं म्हणतं भाजप नेते माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसा आरक्षणावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्य सरकारमधील दोन पक्षांना ओबीसी आरक्षण द्यायचे नाही असं अभिजीत वंजारी यांनी म्हटलं होतं ते आम्ही म्हटलेलं नाही त्यामुळे ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने फुटबॉल करू नये अन्यथा ओबीसी समाज मंत्र्यांना राज्यभर फिरू देणार नाही असा इशारा देखील बावनकुळे यांनी दिला आहे.

राज्य सरकारने 435 कोटी द्यावे

दरम्यान राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या पत्रात राज्य सरकारकडे ओबीसींचा डेटा जमा करण्यासाठी 435 कोटी रूपये आणि मनुष्यबळाची मागणी केली आहे. राज्य सरकारने राज्य मागास आयोगाला निधीचा पुरवठा करावा आणि मनुष्यबळ द्यावं, सोबतच मागचा डेटा जमा करण्यापेक्षा 2021 चा डेटा जमा करावा असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. मात्र, या सरकारमधील दोन पक्षांना ओबीसींना आरक्षण द्यायचंच नसल्याचं सरकारमधीलच एका पक्षाने म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत राज्यातील जनतेला उत्तर द्यायला हवे, आपली भुमिका जनतेसमोर मांडायला हवी असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

आमच्या सरकारच्या काळात आरक्षण गेलं नाही

दरम्यान तुमच्याच सरकारच्या काळात ओबीसी आरक्षण गेले असं जेव्हा पत्रकारांनी म्हटलं तेव्हा आमच्या सरकारच्या काळात ओबीसींचे आरक्षण गेलं नाही, उलट आम्ही आमच्या काळात न्यायलयात ओबीसी आरक्षणाबाबत बाजू मांडली. काँग्रेस नेत्यांनीच त्यावेळी ओबीसी आरक्षणाला आव्हान देत हे आरक्षण जास्त असल्याचे म्हटलं होते असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Updated : 6 Aug 2021 6:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top