Home > Politics > चुकीला माफी नाही;राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

चुकीला माफी नाही;राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

चुकीला माफी नाही;राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
X

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांच्या अटकेवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ईडी कायद्याप्रमाणेच चौकशी करत आहेत. चुकीला माफी नाही, असं चंद्रकांत पाटील म्हटले आहे.

काल मध्यरात्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्याआधी त्यांची सुमारे 13 तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर सेक्शन 19 पीएमएलए अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आज अगदी सकाळी पुण्यात चंद्रकांत पाटील यांना अनिल देशमुख यांच्या अटकेवर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया देताना चुकीला माफी नाही, असं म्हटले आहे.

Updated : 2021-11-02T10:21:13+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top