सभागृह तुम्हाला हवं तसं चालवा आम्ही येणार नाही,चंद्रकांत पाटील भडकले
X
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर विधानपरिषद सभागृहात चर्चा रंगली.विधानपरिषद सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी सीमावादाला जबाबदार कोण?सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे ,अशी भूमिका विरोधीपक्षाने बजावली आहे .
अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र कर्नाटक मधील सीमावादावर प्रश्न निर्माण केला त्याचबरोबर विरोधी पक्षातील शशिकांत शिंदे यांनी,"आम्ही मराठी भाषिकांच्या पाठीशी असणार आहोत .अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हे बोलणं गरजेचं आहे.केंद्रात काय निर्णय झाले हे कळण्यासाठी चर्चा झाली पाहिजे" अशी भूमिका मांडली. त्यावर उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उभे राहिले असताना पुन्हा विरोधी पक्षातील नेते बोलायला लागले .
त्यावेळी सत्ताधारी पक्षात एकच गोंधळ माजला.उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सभागृहाच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना थेट सवाल केला ,सभागृह तुम्हाला हवं तसं चालवा ,आम्ही येणार नाही अशापद्धतीने चंद्रकांत पाटील यांनी विरोध केला.
विधानपरिषद सभागृहामध्ये एकच गोंधळ माजला होता. प्रत्येकाला आपापली मते मांडता यावीत यासाठी सत्ताधारी पक्षाने ठाम भूमिका घेतली.यानंतर उपमुख्यमंत्री यांनी आपले मत मांडले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पहिल्यांदाच राज्याराज्यातील वादात केंद्रिय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केला .सीमावादावर झालेल्या केंद्रीय बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली ,कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचे ट्विट्स प्रक्षोभक असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले आहे पण त्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी माझं ट्विटर हँडल मी चालवत नाही असं सांगितल...यावर तपास सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
"आमच्या मराठी बांधवांना आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे ,ज्याला कर्नाटक सरकारने विरोध केला.यातुन लाठीमार होतो ,तसेच तुरुंगात टाकलं जातं " त्या सर्व मराठी बांधवांच्या पाठीशी असल्याचे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.