Home > Politics > कसबा पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवार ठरणार? चंद्रकांतदादा पाटलांची पुण्यात बैठक...

कसबा पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवार ठरणार? चंद्रकांतदादा पाटलांची पुण्यात बैठक...

कसबा पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवार ठरणार? चंद्रकांतदादा पाटलांची पुण्यात बैठक...
X

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार की या ठिकाणी लढत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षातील अनेक लोक इच्छुक आहेत. त्यात आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं आता स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे या ठिकाणी आता भाजप व महाविकास आघाडी नक्की कोणाला उमेदवारी देणार याची जोरदार चर्चा आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपला सुद्धा उमेदवार देणे मोठी कसरत असणार आहे. कारण अनेक भाजपचे नेते या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कसब्यातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही निवडणूक बिनविरोध होणार का? अशी सुद्धा चर्चा होती. मात्र पोटनिवडणूक बिनविरोध न करण्याची भूमिका विरोधकांनी घेतली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी कोणता उमेदवार द्यायचा याबाबत भाजप नेतृत्वाकडे मोठे आव्हान आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे, हेमंत सासणे, खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट हे सर्व निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे. एकीकडे ही नावे चर्चेत असताना दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक हे देखील या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे टिळक कुटुंबीयांपैकी एकाचा विचार होणार का? हे सर्व आज होणाऱ्या या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.

Updated : 23 Jan 2023 9:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top