Home > Politics > शिवसेनेत आल्याशिवाय 'त्यांना' आजी होता येणार नाही- जयंत पाटील

शिवसेनेत आल्याशिवाय 'त्यांना' आजी होता येणार नाही- जयंत पाटील

शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही- जयंत पाटील
X

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत बोलताना भाजप नेत्यांना भावी सहकारी संबोधून राजकीय चर्चांचा धुराळा उडवून दिला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील मोठं विधान केलं आहे, जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हे सूचक विधान केलं असावं, असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे.ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेनेते काही लोक येण्याची शक्यता आहे. तशी गडबड मला दोन दिवसात दिसते आहे, त्यामुळे हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. त्यांना शिवसेनेत आल्याशिवाय आजी होता येणार नाही, असा चिमटा पाटील यांनी काढला.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच मला माजी मंत्री म्हणू नका असं विधान केले होते, त्या विधानावरून जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

दरम्यान,महाविकास आघाडीत सर्व अलबेल आहे, काहीही मतभेद नाहीत. हे सरकार स्थिर आहे.मागील दोन वर्षांपासून भाजपचे नेते असंच बोलत आहेत. त्याकडे काही लक्ष देण्याची गरज नाही, असंही पाटील म्हणाले.

दरम्यान जयंत पाटील आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यसपीठावर आल्याने आणि त्यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं, त्यावर दवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे,मी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आलो किंवा एका गाडीत दिसलो त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये. राजकारण हा फार सीरीयस बिझनेस आहे. कुणी काय बोलले यावर लगेच अंदाज बांधू नये', असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे ते धुळ्यात बोलत होते.

Updated : 19 Sep 2021 9:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top