Home > Politics > "त्यांच्या फटाक्यात आवाज आणि धूर नाही फक्त वास", राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

"त्यांच्या फटाक्यात आवाज आणि धूर नाही फक्त वास", राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

त्यांच्या फटाक्यात आवाज आणि धूर नाही फक्त वास, राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
X

देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. पण त्याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता ऐन दिवाळीतच फटाके वाजवण्यास सुरूवात केली आहे. नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

बारामतीमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही लोक बॉम्ब फोडण्याचे म्हणत आहेत फक्त त्यांनी धूर काढू नये, असा टोला लगावला होता. त्यावरुन निशाणा साधत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. "मुख्यमंत्री म्हणतात फटाके फोडा पण आज नको आणि धूर नको, असे फटाके फक्त महाविकास आघाडी सरकारच्या दुकानात मिळतात. असाच धूर बारामतीमध्ये निघाला पण त्यात आवाज आणि धूर न्वहता फक्त वास होता, त्यामुळे लोकांना प्रदुषणाचा त्रास झाला, असा टोला त्यांनी लगावला आहे.

त्याचबरोबर संजय राऊत यांच्यावरही टीका करत दादगा नगर हवेलीमध्ये कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्याचे सांगितले. तसेच संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. दुसऱ्याच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.


Updated : 5 Nov 2021 7:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top