Home > Politics > विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात, काँग्रेसचे आक्षेप फेटाळले

विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात, काँग्रेसचे आक्षेप फेटाळले

विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात, काँग्रेसचे आक्षेप फेटाळले
X

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला अखेर सुरूवात झाली आहे. काँग्रेसने भाजपचे दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानाला आक्षेप घेतला होता. हे दोन्ही आमदार गंभीर स्वरुपात आजारी असल्याने त्यांना स्ट्रेचर आणि व्हिलचेअरवर मतदानासाठी आणण्यात आले होते. पण मतदाना दरम्यान त्यांनी दुसऱ्या व्यक्तीने मदत केल्याचा आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. राज्य निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळल्यानंतर काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. पण केंद्रीय निवडणूक आयोगानेही हा आक्षेप फेटाळल्यानंतर आता मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

राज्यात राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेच्या निवडणूकीची रंगत वाढली आहे. मतदानाला सुरूवात झाली आहे. तर दहा वाजेपर्यंत 68 आमदारांनी मतदान केले आहे. मात्र ही विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले. मात्र काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली. तर दहा दिवसात ही दुसरी निवडणूक असल्याने भाजप विरुध्द महाविकास आघाडीत चांगलीच चुरस रंगणार आहे. त्यामुळे आता दहाव्या जागेवर कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी अटीतटीची लढत झाली होती. यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीची दहा मतं फुटल्याने विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीची चिंता वाढली होती. कारण भाजपने इथे एक जास्तीचा उमेदवार दिल्याने निवडणूकीच्या रिंगणात अकरा उमेदवार होते. त्यामुळे या निवडणूकीत कुणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उमेदवार कोण?

प्रविण दरेकर – भाजप

राम शिंदे – भाजप

श्रीकांत भारतीय – भाजप

उमा खापरे – भाजप

प्रसाद लाड – भाजप

एकनाथ खडसे- राष्ट्रवादी

रामराजे नाईक निंबाळकर- राष्ट्रवादी

आमशा पाडवी- शिवसेना

सचिन अहिर – शिवसेना

चंद्रकांत हंडोरे – काँग्रेस

भाई जगताप – काँग्रेस

Updated : 20 Jun 2022 7:31 PM IST
Next Story
Share it
Top