दिल्ली सीबीआय मुख्यालयाला आग, चर्चांना उधाण
दिल्ली सीबीआय मुख्यालयाला आग, चर्चांना उधाण CBI Fire breaks Delhi: Fire breaks out at CBI office
टीम मॅक्स महाराष्ट्र | 8 July 2021 1:01 PM IST
X
X
सीबीआय मुख्यालयाला आग लागली आहे. नवी दिल्ली येथे CBI चं मुख्यालय आहे. या मुख्यालयाच्या मुख्य इमारतीला आग लागल्याची बातमी आहे. सध्या इमारतीमधील सर्व अधिकारी मुख्यालयाच्या बाहेर आले असून इमारतीमधून धुराचे लोट निघत आहे.
सध्या अग्निशामक दलाल पाचारण करण्यात आलं असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सीबीआयच्या या कार्यालयात आग लागल्यानं नक्की आत्तापर्यंत काय जळालं? आणि कोण कोणत्या बाबींचं नुकसान झालं हे समोर आलेलं नाही. सध्या आग विझवण्याचं काम सुरु आहे. दरम्यान सीबीआय मुख्यालयाला लागलेल्या आगीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
Updated : 8 July 2021 1:01 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire