Home > Politics > कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा काँग्रेस हायकमांडवर जोरदार निशाणा

कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा काँग्रेस हायकमांडवर जोरदार निशाणा

कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा काँग्रेस हायकमांडवर जोरदार निशाणा
X

चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेस हायकमांडवर जोरदार निशाणा साधला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याकडे पुरेसा अनुभव नाही असं म्हणत, त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविरोधात तगडा उमेदवार देऊ असे जाहीर केले.दरम्यान पक्षाचे सल्लागारच काँग्रेस नेतृत्वाची दिशाभूल करत असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे की, आम्ही पूर्ण ताकदीनिशी सिद्धू यांच्याविरोधात लढायला तयार आहोत. सिद्धू सारख्या घातक माणसापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचा त्याग करायला तयार आहे. असं कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे. सोबतच आपण तीन आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती मात्र, सोनिया गांधी यांनीच आपल्याला पदावर कायम राहण्याचे निर्देश दिले होते. मी स्वत: एक माजी सैनिक आहे त्यामुळे युद्ध कसे लढायचे हे मला चांगलेच ठावूक आहे असं ते म्हणाले.

Updated : 23 Sep 2021 2:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top