Home > Politics > Milind Narvekar : मिलिंद नार्वेकर उध्दव ठाकरे यांची साथ सोडणार? मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण

Milind Narvekar : मिलिंद नार्वेकर उध्दव ठाकरे यांची साथ सोडणार? मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण

Milind Narvekar : राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली. मात्र मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली. त्यावरून मिलिंद नार्वेकर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Milind Narvekar : मिलिंद नार्वेकर उध्दव ठाकरे यांची साथ सोडणार? मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण
X

राज्यातील शिंदे-फडणवीस (Eknath Shinde and Devendra fadnavis)सरकारने महाविकास आघाडीच्या (Mahavikas aghadi)नेत्यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र शिवसेनेचे सचिव आणि उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray PA) यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar security increase) यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात येत असताना मिलिंद नार्वेकर यांना झुकते माप का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना (balasahebanchi Shivsena) पक्षात जाणार असल्यानेच त्यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यावर मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी आपली भूमिका मांडली.

उदय सामंत ठाणे येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर हे पुर्वीपासूनचे मित्र आहेत. राजकीय प्रवाह बदलले म्हणून मैत्री तोडावी, या मताचे आम्ही नाहीत. मात्र त्यांच्या राजकीय जीवनामुळे किंवा सहवासामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार असेल तर ते योग्य नाही. त्यामुळे ते जर आमच्या पक्षात आले तर त्यांचे स्वागतच. पण ते जरी उध्दव बाळासाहेब ठाकरे (Uddhav balasaheb Thackeray) यांच्या पक्षात राहिले तरी त्यांच्याबद्दल आदर आहे. कारण आमच्या राजकीय कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेकदा मदत केली आहे, असं मत व्यक्त करीत उदय सामंत यांनी व्यक्त केले.

मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत चर्चा का? (What is the reason milind narvekar can leave Shivsena UBT?)

  • मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव आणि उध्दव ठाकरे यांची स्वीय सहाय्यक आहेत. मात्र ते गेल्या काही दिवसांपासून उध्दव ठाकरे यांच्यासोबत दिसत नाहीत.
  • राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली होती. तसेच गणेशोत्सवादरम्यान एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले होते.
  • मिलिंद नार्वेकर हे एमसीएच्या निवडणूकीत भाजप, शिंदे गटाच्या पाठींब्यासह सर्वाधिक मताने निवडून आले.
  • उध्दव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर यांच्याऐवजी रवी म्हात्रे (Ravi Mhatre) हे पहायला मिळतात.
  • मिलिंद नार्वेकर राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात फारसे सक्रीय दिसत नाहीत.

Updated : 30 Oct 2022 2:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top