Home > Politics > गुदमरलेल्या संजय राऊत यांचा श्वास न्यायालयामुळे होणार मोकळा!

गुदमरलेल्या संजय राऊत यांचा श्वास न्यायालयामुळे होणार मोकळा!

गुदमरलेल्या संजय राऊत यांचा श्वास न्यायालयामुळे  होणार मोकळा!
X

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीत विशेष सत्र न्यायालयाचे न्यायमुर्ती एम. जी. देशपांडे यांनी संजय राऊत यांची ED कोठडी वाढवण्याचे आदेश दिले. या सुनावणी दरम्यान झालेल्या य़ुक्तीवादात संजय राऊत यांनी त्यांची खोली बदलण्याची मागणी केली होती आणि न्यायालयाने ती मंजूर केली आहे.

ED ची उल्लेखनीय प्रगती

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर सोमवारी १ ऑगस्टला अटकेची कारवाई करण्यात आली. त्याच दिवशी त्यांना ED ने विशेष सत्र न्यायालयात हजर केलं होतं. त्यावेळी त्यांची ED कोठडी ४ ऑगस्ट पर्यंत सुनावण्यात आली होती. गुरूवारी पुन्हा एकदा सुनावणीला सुरूवात झाली. त्यावेळी विशेष न्यायाधीश एम.जी. देशपांडे म्हणाले की, एजन्सीने तपासात "उल्लेखनीय प्रगती" केली आहे. "हे खरं आहे की 1.17 आणि 1.08 कोटी रुपयांची ट्रायल यापूर्वी कोर्टासमोर नव्हता... आणखी काही रक्कम उघड झाली आहे. ईडीने बँक स्टेटमेंट्स आणि पुढील ट्रायल काढल्या. याशिवाय न्यायमुर्ती देशपांडे यांनी साक्षीदार स्वप्ना पाटकर यांच्या वतीने अधिवक्ता रणजीत सांगळे यांनी दाखल केलेला संजय राऊत यांनी हस्तक्षेप केलेला हस्तक्षेप अर्जही फेटाळून लावला.

मला खोली बदलून हवी

जेव्हा गुरूवारी सुनावणीला सुरूवात झाली त्यावेळी न्यायलयाने संजय राऊत यांना काही तक्रार आहे का असे विचारले. यावर आपली ED विरोधात काही तक्रार नाही फक्त मला ज्या खोलीत ठेवले आहे तिेथे साधी खिडकी नाही त्यामुळे खोलीत खेळती हवा नाही. यावर ED चं कार्यालय हे संपुर्णतः वातानुकूलित आहे त्यामुळे खोलीला कोणतीही खिडकी नाही. त्यावर राऊत यांनी म्हटलं की तिथे एसी आहे परंतू तब्येतीच्या कारणास्तव मी तो लावत नाही. त्यावर न्यायालयाने ED ला राऊत यांना हवा खेळती राहिल अशा खोलीत ठेवण्याचे आदेश दिले आणि मग पुढील सुनावणीला सुरूवात झाली.

आणखी तपासाची आवश्यकता

या प्रकरणी ED ला आणखी पैलुंवर तपास करण्याची आवश्यकता आहे. ८ ऑगस्टपर्यंतचा कालावधी त्यासाठी पुरेसा आहे त्यामुळे पुढील सुनावणी ही ८ ऑगस्टला होईल आणि तोपर्यंत संजय राऊत हे ED च्याच कोठडीत राहतील.

Updated : 4 Aug 2022 10:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top