Home > Politics > भाजपचे तुषार भोसले यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना नाशिक शहरात फिरू देणार नाही- अंबादास खैरे

भाजपचे तुषार भोसले यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना नाशिक शहरात फिरू देणार नाही- अंबादास खैरे

भाजपचे तुषार भोसले यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना नाशिक शहरात फिरू देणार नाही- अंबादास खैरे
X

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी टीका केली आहे. याबद्दल त्यांनी जाहीर मागावी, अन्यथा तुषार भोसले यांना नाशिक शहरात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात भाजपा अध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले समाज माध्यमातून टीका केली. भोसले यांनी केलेली टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.असे राष्ट्रवादीचे खैरे यांनी म्हटले आहे. क्रूझ पार्टी प्रकरण हाताळत असलेल्या NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधारातील पुरावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समोर आणल्यानंतर भाजपाने या प्रकरणात आगपाखड करण्याचे कारण नाही. मात्र, केवळ आपले पक्षप्रेम सिद्ध करण्यासाठी लहान उंचीचे व्यक्तिमत्व असलेल्या तुषार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करत तुषार भोसले यांच्या घरी समज देण्यासाठी गेले. मात्र, ते भीतीपोटी घर सोडून फरार आहेत. असं म्हणत त्यांनी आहे त्या ठिकाणावरून जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना नाशिक शहरात फिरू न देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिला आहे.

Updated : 28 Oct 2021 12:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top