Home > Politics > मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर भाजपच्या शिक्षक संघटनेचं आंदोलन

मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर भाजपच्या शिक्षक संघटनेचं आंदोलन

मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर भाजपच्या शिक्षक संघटनेचं आंदोलन
X

मुंबई महानगर पालिका मुख्यालयासमोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नवं शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना उलटला असूनही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप झालं नसल्याने हे आंदोलन केल्याचं शिक्षक कर्मचारी म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह 27 वस्तू देते. यामध्ये पुस्तके, वह्या, रंगपेटी, कंपासबॉक्स आदी वस्तू शैक्षणिक वर्ष सुरु होताच दिल्या जातात. शाळा सुरू होऊन 20 दिवस झाले असून विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत कोणतेही पुरक शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. तसेच रात्र शाळेतील विद्यार्थ्यांना सुध्दा सदर शैक्षणिक साहित्य मिळावे अशी मागणी या आंदोलनकर्त्या शिक्षकांनी केली शिवाय मनपाच्या इमारतीत भरणा-या रात्र शाळांचे भाडेदेखील माफ करण्याची मागणी त्यांनी केली.

नविन इंग्रजी शाळांना शिक्षकच नाहीत.

गरीब विद्यार्थ्याचे शैक्षणिक साहित्याविना प्रचंड नुकसान होत असून पुढील 1-2 महिने शैक्षणिक साहित्य मिळणार नाही असे दिसते कोविङ काळात विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले असून कोविड काळात ऑनलाईन शिक्षणासाठी मनपाने टॅबही दिले नाहीत. आता शैक्षणिक साहित्य नाही.

अन्यथा शिक्षक साखळी आंदोलन करणार

महापालिकेने विद्यार्थ्यांना लवकर शालेय साहित्याचे वाटप केले नाही तर सर्व आंदोलक शिक्षक कर्मचारी हे मानवी साखळी करून आंदोलन करतील असा इशारा त्यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनाला भाजपचा देखील पाठींबा असल्याचे पाहायला मिळाले.

Updated : 2 July 2022 12:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top