News Update
Home > Politics > जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार; भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार; भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार; भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज घेतले मागे
X

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत सोमवारी माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे वर्चस्व या बॅंकेवर राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूक रिंगणातून भाजपच्या सर्वच उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची बॅंक असून या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रतिनिधीत्व मिळावे, तसेच महाविकास आघाडीने केलेल्या दगाबाजीचा निषेध म्हणून भाजप ही माघार घेण्यात येत असल्याचे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सांगितले.

Updated : 8 Nov 2021 3:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top