Home > Politics > 'भोक तुमच्या फुग्याला पडलंय' ; चंद्रकांत पाटील यांचं शिवसेनेला प्रत्युत्तर

'भोक तुमच्या फुग्याला पडलंय' ; चंद्रकांत पाटील यांचं शिवसेनेला प्रत्युत्तर

भोक तुमच्या फुग्याला पडलंय ; चंद्रकांत पाटील यांचं शिवसेनेला प्रत्युत्तर
X

मुंबई// 'अनिल परब यांच्याबाबत आम्ही कोर्टात याचिका करणार आहोत. त्यांची क्लिप काल जगानं पाहिली. किती कायदा हातात घेणं चाललंय? किती अरेरावी चाललीये? पोलिस आणि गुंडांच्या बळावर हे सरकार चाललंय. त्यामुळे ती क्लिप घेऊन आम्ही न्यायालयात जातोय'

असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान 'स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली हा संदर्भ देताना मुख्यमंत्री उद्धवजी चुकले, हे झाकण्यासाठी सगळा खटाटोप सुरू आहे. मारण्यासाठी मातोश्रीवर जाईन, शोधून मारेन असं काहीही राणेसाहेब म्हणालेले नव्हते. एखाद्या वाक्याबाबत समजावण्याची व्यवस्था आहे. पण इतकं टोक गाठणं चुकीचं आहे' असं देखील पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान ज्या वाक्यावरून राज्यात एवढा गोंधळ उडाला ते वाक्य काय आहे? पण मुख्यमंत्री उद्धवजींनी स्वातंत्र्याबाबतचा संदर्भच चुकवला. त्यांना अजिबात ज्ञान नाही. त्यामुळे त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकारही नाही. ते राहिलं बाजूलाच, उलट ते झाकण्यासाठी राणे राणे जप करत अटकेचं सूडनाट्य रचलं जात असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Updated : 25 Aug 2021 11:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top