Home > Politics > जळगाव जिल्हा बँक निवडणूक, सत्ता वाटपासाठी मतभेद विसरून चारही पक्ष एकत्र

जळगाव जिल्हा बँक निवडणूक, सत्ता वाटपासाठी मतभेद विसरून चारही पक्ष एकत्र

ED आणि CD चा कलगीतुरा राज्यात चांगलाच रंगला होता. मात्र हा कलगीतुरा वेगळ्या टप्प्यावर येत असतांनाच जळगाव जिल्हा सहकारी बँकेसाठी खडसें आणि महाजन एकत्र आल्याने ED आणि CD एकत्र आले का ? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणूक, सत्ता वाटपासाठी मतभेद विसरून चारही पक्ष एकत्र
X

राज्यात आताच्या घडीला सर्वाधिक राजकीय वैर कोणात असेल तर ते जळगाव जिल्ह्यातील भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच...या दोघांचे हाडवैर सर्व सर्वश्रूत आहे. मात्र हे दोघे नेते जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी मांडीला मांडी लावून एकत्र आले आहेत. यासाठी शिवसेनेचे गुलाबराव पाटील सरसावले आहेत.

खडसें-महाजन या दोघा नेत्यांमुळे ED आणि CD हे शब्ध राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये सर्वाधिक प्रचलित झालेत. भोसरी MIDC भूखंड खरेदी प्रकरणी खडसेंवर ED चा फास आवळला आहे , भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यावर खडसेंनी भाजपला धमकी वजा इशारा देत ED लावली तर CD लावू अस म्हटलं होतं , एका माजी मंत्र्यांची CD आपल्याकडे असल्याचं सांगून खडसेंनी खळबळ उडवून दिली होती. आता खडसेंवर ED प्रकरणात प्रकरणात दोषरोप पत्र दाखल झाल्यानंतर खडसेंकडे CD असेल तर दाखवावी अस जाहीर आव्हान गिरीश महाजन यांनी दिले होतं. हाच ED आणि CD चा कलगीतुरा राज्यात चांगलाच रंगला होता. मात्र हा कलगीतुरा वेगळ्या टप्प्यावर येत असतांनाच जळगाव जिल्हा सहकारी बँकेसाठी खडसें आणि महाजन एकत्र आल्याने ED आणि CD एकत्र आले का ? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्वपक्षीय नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, 21 पैकी एक-दोन जागांबाबत एकमत होत नसल्याने सर्वपक्षीय पॅनलचे घोडे अडले आहे. सोमवारी रात्री सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेली कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात चर्चेची दुसरी फेरी पार पडली. पण ठोस निर्णय होऊ शकला नाही. आता जागा वाटपाच्या अंतिम निर्णयासाठी पुन्हा बैठक होणार असून, त्यात सर्वपक्षीय पॅनलचा तिढा सुटेल, अशी अपेक्षा आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी रात्री अजिंठा शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, भाजपकडून माजीमंत्री गिरीज महाजन, आमदार सुरेश भोळे तसेच काँग्रेसच्या वतीने आमदार शिरीष चौधरी व जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील आदींची उपस्थिती होती. निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर सुमारे तासभर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये बंदद्वार खल चालला. पण अखेर एक-दोन जागांबाबत निर्णय होऊच शकला नाही.

चौघा पक्षांनी सव्वा सव्वा वर्षे अध्यक्ष-उपाध्यक्ष पद वाटप फार्मूला

सर्वपक्षीय बैठकीत बँकेच्या अध्यक्षपदाचा फॉर्म्युला मात्र, सर्वानुमते ठरला. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस अशा चारही पक्षांनी 5 वर्षांपैकी प्रत्येकी सव्वा-सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटून घ्यावे, असा निर्णय नेत्यांमध्ये झाला आहे. मात्र, सुरुवातीला नेमक्या कोणत्या पक्षाचा अध्यक्ष असेल, हे अद्याप ठरलेले नाही. निवडणुकीनंतर ऐनवेळी त्याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जात आहे.

गुलाबराव पाटील- पालकमंत्री

चौघे पक्ष मिळून ही निवडणूक लढवावी अस सर्वानुमते सर्वपक्षीय पॅनल निवडणूकचे ठरलं आहे. एका जागेचा तिढा आहे तोही सुटेल. बँकेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सव्वा सव्वा वर्ष वाटून घ्यावे अस ठरल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

गिरीश महाजन - भाजप नेते

चौघा प्रमुख राजकीय पक्षांशी सकारात्मक चर्चा झाली सर्वपक्षीय पॅनल असेल , एक दोन जागेची अजून चर्चा बाकी आहे तीही सुटेल , बँक चांगल्या स्थितीत आहे पुन्हा बँकेला चांगली करण्यासाठी एकत्र आलो आहोत , खडसें येणार असतील तर भाजप सर्वपक्षीय पॅनलमध्ये राहणार नाही असं भाजपने कधीही म्हटलं नव्हतं अस गिरीश महाजन यांनी सांगितलं.

एकनाथ खडसे- राष्ट्रवादी नेता

सहकारात राजकारण नको म्हणून गेल्या वेळीही आपण सर्वपक्षीय पॅनल केलं होतं. बँक चांगल्या स्थितीत रोहिणी खडसें अध्यक्ष असंतांना आणली. आताही सर्वपक्षीय पॅनल असावं यासाठी प्रयत्न आहेत, एक दोन जागांचा प्रश्न आहे तोही मिटेल. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सर्व पक्षांना संधी मिळावी यासाठी कोअर कमिटी ठरवणार आहे.

Updated : 28 Sep 2021 3:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top