Home > Politics > UP ELECTION : Love जिहाद प्रकरणात १० वर्षे तुरुंगवास आणि १ लाख दंड, भाजपचा जाहीरनामा

UP ELECTION : Love जिहाद प्रकरणात १० वर्षे तुरुंगवास आणि १ लाख दंड, भाजपचा जाहीरनामा

UP ELECTION : Love जिहाद प्रकरणात १० वर्षे तुरुंगवास आणि १ लाख दंड, भाजपचा जाहीरनामा
X

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. लोककल्याण संकल्पपत्र असे नाव भाजपने या जाहीरनाम्याला दिले आहे. यामध्ये Love Jihad प्रकरणात किमान १० वर्षांचा तुरुंगात आणि १ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

त्याचबरोबर शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचबरोबर राणी लक्ष्मीबाई योजने अंतर्गत कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना मोफत स्कूटी दिल्या जाणार आहेत. तसेच ६० वर्षांवरील महिलांना मोफत प्रवासाची सवलत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच उज्ज्वला योजनेअंतर्गत दिवाळी आणि होळीसाठी २ सिलेंडर मोफत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Updated : 8 Feb 2022 7:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top