Home > Politics > महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार ; भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्यक्त केला निर्धार

महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार ; भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्यक्त केला निर्धार

महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार ; भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्यक्त केला निर्धार
X

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार असे आतापर्यंत राज्यातील भाजपा नेत्यांकडून बोलले जात होते. आता थेट भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना हा निर्धार व्यक्त केला. येत्या काळात महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार असून, आम्ही महाविकास आघाडी सरकार उलथून टाकू असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

जेपी नड्डा यांचे आज सकाळी मुंबई विमानतळावर आगमन झाले. नड्डा यांचे भाजपाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थिती होते. मुंबईमध्ये आसाममधील भाजपा आमदारांचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, उद्या नड्डा यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जेपी नड्डा हे भाजपाच्या नेत्यांना संबोधित करणार आहेत.

दरम्यान यावेळी नड्डा यांनी महाविकास आघाडी सरकार हद्दपार करू असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तृळात चर्चेला उधान आले आहे. मात्र, दुसरीकडे आमचे सरकार स्थिर असून, आगामी निवडणुकीपर्यंत आम्हीच सत्तेत राहाणार असल्याचे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी म्हटले आहे.

Updated : 12 Nov 2021 5:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top