Home > Politics > शिवेंद्रराजेंना उदयनराजेंचं प्रत्युत्तर "मी लोटांगण घालत फिरेन…"

शिवेंद्रराजेंना उदयनराजेंचं प्रत्युत्तर "मी लोटांगण घालत फिरेन…"

शिवेंद्रराजेंना उदयनराजेंचं प्रत्युत्तर मी लोटांगण घालत फिरेन…
X

सातारा नगरपालिका निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीआधीच उदयनराजे विरुद्ध शिवेंद्रराजे भोसले असा सामना रंगताना दिसत आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थेट उदयनराजे यांच्यावर जोरदार टीका करत "सातारा शहरात टुव्हीलर चालवत विकास कामाचे उद्घाटन करत फिरणाऱ्यांनी पाच वर्ष फक्त पोस्टरबाजीवरच विकास केला आहे. त्यांनी टू व्हीलर जशी व्यवस्थित चालवली तसेच सातारची नगरपालिका देखील पाच वर्ष व्यवस्थित चालवायला हवी होती. आज जी विकास कामे दाखवली जात आहेत, ती फक्त नौटंकी आहे अशी घणाघाती टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली होती. आता त्यांच्या या टीकेला उदयनराजे यांनी उत्तर दिलं आहे.

"मला चारचाकी परवडत नाही. मी दुचाकीवरुन फिरेन, चालत फिरेन, रांगत फिरेन, माझे गुडघे दुखतात… हवं तर मी लोळत फिरेन, गडगडत जाईन. कोणाला काय समस्या आहे? त्याबद्दल कोणाला दुख: वाटत असेल तर तुम्हीही तसं करा. लोकशाही आहे. जनतेला कामं हवी आहेत. ती करायची नाहीत आणि आणि मग टीका करायची. नावं ठेवायला अक्कल लागत नाही. पण कॉमन सेन्स फारशी कॉमन नाही आहे. संबंधित लोकं जी नावं ठेवतात मला त्यांनी हिंमत असेल तर समोरासमोर या ना… तेव्हा पूर्वनियोजित कार्यक्रम होते असं सांगतात. माझा फक्त एकच पूर्वनियोजित कार्यक्रम असतो तो म्हणजे जनतेची सेवा". असं उत्तर उदयनराजे यांनी दिलं आहे.

Updated : 14 Oct 2021 9:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top