Home > Politics > BJP खासदाराने उघडला विमानाचा आपत्कालिन दरवाजा? काँग्रेस, तृणमूल, MIM चा आरोप

BJP खासदाराने उघडला विमानाचा आपत्कालिन दरवाजा? काँग्रेस, तृणमूल, MIM चा आरोप

इंडिगो विमानाचा आपत्कालिन दरवाजा भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांनी उघडल्याचा आरोप MIM सह तृणमुल काँग्रेस आणि काँग्रेसने केला आहे.

BJP खासदाराने उघडला विमानाचा आपत्कालिन दरवाजा? काँग्रेस, तृणमूल, MIM चा आरोप
X

नेपाळमध्ये (Nepal plane crashed) विमान दुर्घटना घडल्याच्या पार्श्वभुमीवर देशातील आणखी एक विमानातील घटना चर्चेत आली आहे. 10 डिसेंबर 2022 चेन्नईहून तिरुचिरापल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचा (Indigo Airlines) आपत्कालिन दरवाजा एका प्रवाशाने उघडला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. तर हा प्रवासी भाजप खासदार तेजस्वी सूर्या (BJP MP Tejaswi Surya) असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस, तृणमुल काँग्रेस आणि MIM ने केला आहे.

10 डिसेंबर 2022 रोजी चेन्नईहून तिरुचिरापल्ली (Chennai to Tiruchirapalli) दरम्यान इंडिगो एअरलाईन्सच्या 6E- 7339 या विमानाचा आपत्कालिन दरवाजा एका प्रवाशाने उघडला. त्यामुळे विमानाला दोन तास उशीरर झाला. त्यावेळेस प्रवाशाने विमान कंपनीची माफी मागितली. त्यानंतर विमान कंपनीने प्रवाशाची माफी स्विकारली. मात्र कंपनीने प्रवाशावर कारवाई केली नाही. यानंतर काँग्रेस, तृणमुल काँग्रेस (Congress) आणि MIM ने तो प्रवासी भाजप खासदार तेजस्वी सूर्या असल्याचा आरोप केला. त्यानंतर याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

काँग्रेस प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला (Randeep singh Surajewala) यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, भाजपचे VIP, एअरलाईन्सकडे तक्रार करायची हिंमत कशी झाली? ही वृत्ती सत्तेमुळे आली आहे का? प्रवाशांच्या सुरक्षेसोबत तडजोड का? ओह... तुम्ही भाजपच्या व्हिआयपींना (BJP VIP) प्रश्न विचारू शकत नाही, अशी टीका रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केली.

याबरोबरच तृणमुल काँग्रेसने (TMC) ट्वीट करून थेट भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्यावर टीका केली आहे. यामध्ये तृणमुल काँग्रेसने म्हटले आहे की, भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांचा जीव गेला असता. सूर्या यांनी इंडिगो फ्लाईटचा आपत्कालिन दरवाजा उघडला होता. पण डीजीसीए त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाही. त्यांच्या पक्षाने त्यांना मोफत पास दिला आहे का? असा सवाल तृणमुल काँग्रेसने केला आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, तुमचे नाव 'सुसंस्कृत' असेल तर ते कॅज्युअल आहे. पण जर तुमचे नाव अब्दुल अशेल तर...कृपया सीटबेल्ट बांधा.' असा टोला लगावला आहे.

यावर DGCA ने यावर प्रतिक्रीया देतांना म्हटले आहे की, तामिळनाडूचे भाजप प्रमुख अन्नामलाई, DMK चे प्रवक्ते बीटी अर्साकुमार आणि भाजप खासदार तेजस्वी सूर्या एकाच विमानात समोर आले. यावेळी या घटनेनंतर त्यांना खाली उतरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार आम्ही सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली नाही, असं मत DGCA चे महासंचालकांनी सांगितले.

Updated : 18 Jan 2023 6:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top