Home > Politics > पोलिसांच्या मदतीने राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न- विखे

पोलिसांच्या मदतीने राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न- विखे

पोलिसांच्या मदतीने राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न- विखे
X

उस्मानाबाद :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद पाहुन मुंबई महानगरपालिकेची सत्ता जाते की काय याने घाबरलेल्या शिवसेनेने सूडबुद्धीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केल्याचे म्हणत भाजपने उस्मानाबाद येथे महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार आंदोलन केले.

ही कारवाई तालिबानी पध्दतीची असल्याचे म्हणत सरकारचा कळंब तालुका भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी कळंब शहरातील छत्रपती शिवाजी चौकात आघाडी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

भविष्यात अशीच पध्दत रूढ होऊ नये यासाठी भाजप तीव्र विरोध करेल असं भाजप तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनी म्हटले आहे. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 25 Aug 2021 9:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top