Home > Politics > ST महामंडळाच्या कोट्यवधींच्या जमिनी विकण्याचा अनिल परब यांचा डाव, पडळकर यांचा आरोप

ST महामंडळाच्या कोट्यवधींच्या जमिनी विकण्याचा अनिल परब यांचा डाव, पडळकर यांचा आरोप

ST महामंडळाच्या कोट्यवधींच्या जमिनी विकण्याचा अनिल परब यांचा डाव, पडळकर यांचा आरोप
X

Photo courtesy : social media

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता १ महिना उलटून गेला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आता संपकरी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सुरू केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गंभीर आरोप केला आहे. "ज्या पद्धतीने मुंबईतील मिल कामगारांचा संप चिघळवला आणि शेवटी अनिर्णित परिस्थितीत आणून ठेवला आणि मग मिल मालकांसोबत मिलीभगत करत जमिनी विकून कोट्यवधींची टक्केवारी गोळा केली होती. त्याच हेतूने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून विविध शहरातील कोट्यवधींच्या जमिनींची विल्हेवाट लावण्याचा अनिल परबांचा डाव दिसतो आहे" असा आरोप पडळकर यांनी केला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी आपले अपयश झाकण्याकरिता, आपल्यावर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर एस.टी कर्मचाऱ्यांचे डोके भडकवत असल्याचे आरोप केले. पण तीन आठवड्यांचा कालावधी गेल्यानंतरसुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. आता ते मुघलशाही पद्घतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी देत आहेत, त्याचा आम्ही विरोध करतो, अश भूमिका पडळकर यांनी मांडली आहे.

Updated : 11 Dec 2021 7:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top