Home > Politics > 'वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात' ; भाजप आमदार आशिष शेलार यांचा घणाघात

'वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात' ; भाजप आमदार आशिष शेलार यांचा घणाघात

वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात ; भाजप आमदार आशिष शेलार यांचा घणाघात
X

मुंबई : कोरोना संदर्भात सरकारकडून लावण्यात आलेल्या निर्बंधाबाबत बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी "ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे, वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात" असं शेलार यांनी म्हटले आहे. रेस्टॉरंटवाले, बारवाले यांच्याकडून वाटा मिळाला की, निर्बंधात शिथिलता दिली जाते. तर दुसरीकडे घाट्यात असलेले मराठी कलावंत, नाटक कलावंत, लोककलावंत, नारळ, धुप ,कापूर विकणारे हे घाट्यात आहेत, ते वाटाघाटी करु शकत नाहीत,म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. असा घणाघात त्यांनी केला.

दरम्यान आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटघाटी करणार का? असा खरमरीत सवाल करीत शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली. आमदार आशिष शेलार यांनी वांद्रे येथे पत्रकारांशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते. काल दिवसभर गोविंदाला नोटीस काय, धरपकड काय, बलाचा वापर काय? काय चाललंय महाराष्ट्रात असं ते म्हणाले, सोबतच ज्यावेळी आम्ही सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात मांडला तेंव्हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे लादेन आहे काय? असा केला होता मग आज आमचा सवाल आहे , गोविंदा काय लादेन आहेत काय? असं शेलार म्हणाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजप सरकारच्या भूमिकेच्या बाजूने आहे, पण निर्बंधांमध्ये वाटाघाटी करून निर्बंधाचा धंदा करण्याच्या सिलेक्टीव्ह कामामध्ये आम्ही बरोबर नाही. असं म्हणत नियमावली करून मंदिर उघडा, प्रादुर्भाव वाढणार नाही, तसेच काही नियम घालून गणेशोत्सव साजरा करू द्या. हिंदु सणांवर आक्रमण बंद करा असं शेलार यांनी म्हटले आहे.

Updated : 2 Sep 2021 8:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top