Home > Politics > चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष ; आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष

चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष ; आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष

चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष ; आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष
X

आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांना भाजपने नवी जबाबदारी दिली आहे. त्यांना भाजपच्या मुंबई महानगरच्या अध्यक्षपदी निवड केली असून चंद्रकांत पाटलाच्या जागेवर महाराष्ट्राच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावणकुळे यांची नेमणुक केली आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महत्त्वाचा बदल केला आहे. मुंबई भाजपचे आधीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्यावर त्यांचा जागी अध्यक्ष म्हणून आशिष शेलार यांची नेमणूक करण्यात आली आहे. आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड ही महत्वाची मानली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार नुकताच झाला आहे. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर मुंबई महानगरचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर भाजपने निवडी जाहीर केल्या आहेत.

महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत बावणकुळे यांची निवड करण्यात आली आहे. तर मुंबई महानगर अध्यक्ष म्हणून आशीष शेलार यांची निवड करण्यात आली आहे. आशिष शेलार हे या आधीही मुंबईचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळच्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळे आगामी निवडणूक लक्षात घेता पुन्हा एकदा त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

आशिष शेलार यांचे भाजपच्या कार्यकारिणीत मोठे स्थान आहे. त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. ते भाजपचे विधानसभेचे मुख्य प्रतोद राहिले आहेत. या बरोबरच शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सलग सात वर्षे मुंबई भाजपाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून २६ हजार ९११ मताधिक्याने विजयी तर सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा २६,५५० मताधिक्य राखून विजयी झाले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष ; आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्षपंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन राष्टीय अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री अमितभाई शाह आणि तत्कलीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या सन २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपाने ३३ वरून तब्बल ८३ जागा मिळवून घवघवीत यश संपादन केले. या निवडणुकीत आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुंबई भाजपाचे नेतृत्व केले. त्यांचा हा अनुभव बघता आणि महानगर पालिकेच्या निवडणुकांमुळे त्यांना पुन्हा अध्यक्षपद देण्यात आले आहे. या सगळ्या निवडप्रक्रीयेपासून उपमुख्यमंत्री फडणवीसांना दूर ठेवले असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात भाजपमधे मोठे फेरबदल संभवतात..

Updated : 12 Aug 2022 12:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top