Home > Politics > Video: जर तुम्हाला पेट्रोल स्वस्त हवे असेल तर अफगाणिस्तानला जा, भाजप नेत्याचा अजब सल्ला...

Video: जर तुम्हाला पेट्रोल स्वस्त हवे असेल तर अफगाणिस्तानला जा, भाजप नेत्याचा अजब सल्ला...

Video: जर तुम्हाला पेट्रोल स्वस्त हवे असेल तर अफगाणिस्तानला जा, भाजप नेत्याचा अजब सल्ला...
X

कोरोना महामारीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहेत. यामुळे, सामान्य माणूस कोरोना आणि महागाईच्या दुहेरी संकटांचा सामना करत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. जर तुम्हाला स्वस्त पेट्रोल आणि डिझेल हवे असेल तर अफगाणिस्तानला जा. असं वादग्रस्त विधान भाजप नेत्यांनी केलं आहे. पत्रकाराशी बोलतांना मध्य प्रदेशातील कटनीचे भाजप जिल्हाध्यक्ष रामरतन पायल म्हणाले, "तालिबानला जा, तिथे जा आणि पाहा. तिथे पेट्रोल 50 रुपये आहे. तिथून भरून या, तिथे पेट्रोल भरण्यासाठी कोणी नाही. दरम्यान, पायल यांनी पत्रकारांनाच खडे बोल सुनावले. देशात कोरोनाच्या दोन लाटा आल्या आहेत. तिसरी लाट येणार आहे. देश कोणत्या परिस्थितीतून जात आहे, तुम्हाला काही कल्पना आहे का? आणि तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचं पडलं आहे. "पण मी माझ्या देशाबद्दल बोलत आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे? यावर भाजप नेते पुन्हा म्हणाले, 'मग तालिबान्यांकडे जा, तू इथे का आहेस'? धक्कादायक बाब म्हणजे व्हिडिओमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेबद्दल बोलत होते. मात्र, त्यांनी स्वतः मास्क लावला नव्हता. एवढंच काय तर त्यांचे कार्यकर्तेदेखील मास्क न घालता एकत्र उभे होते.दरम्यान, काँग्रेसने बुधवारी एलपीजीच्या किंमतीत झालेल्या ताज्या दरवाढीवर केंद्र सरकारवर हल्लाबोल केला असून, सरकार दर महिन्याला एलपीजीच्या किंमतीत वाढ करून 'खंडणी योजना' चालवत आहे. अशा शब्दात कॉंग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. गॅस सिलिंडरच्या किंमती कमी करून सामान्य गृहिणींना दिलासा द्यावा असा सल्ला काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी फेसबुकवर एलपीजीच्या वाढत्या किमतींबाबत सरकारवर निशाणा साधला आहे. "जुमल्यांचे सत्य जनतेसमोर आहे, गेल्या 7 वर्षात 'उलटा विकास' झाला आहे.
" तसेच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा यांनी केंद्र सरकारवर स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती वाढवून 'खंडणी योजना' चालवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ट्विट केलं आहे की, "गेल्या 1 जुलैला मोदीजी यांच्या सरकारने एलपीजी ची किंमत 25 रुपयांनी वाढवली आहे. तर आता 17 ऑगस्टला पुन्हा 25 रुपयांनी वाढ केली आहे. उज्ज्वलाचे स्वप्न दाखवून, एलपीजीच्या दरात दरमहा वाढ करून भाजप सरकारच्या खंडणी योजनेला भरभराट येत आहे."
तर दुसरीकडे, पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्यासह पक्षाच्या अनेक महिला नेत्यांनी बुधवारी मातीचे स्टोव्ह, लाकूड आणि गॅस सिलिंडरसह माध्यमांशी संवाद साधला आणि सरकारला आग्रह केला की, एलपीजीच्या किंमतीत झालेली वाढ परत घेऊन सामान्य गृहिणींना दिलासा दिला पाहिजे.

Updated : 19 Aug 2021 12:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top