Home > Politics > स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे म्हणवणारे खिंड सोडून पळाले, थोरात यांच्या राजीनाम्यावरून विखेंचा खोचक टोला

स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे म्हणवणारे खिंड सोडून पळाले, थोरात यांच्या राजीनाम्यावरून विखेंचा खोचक टोला

स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे म्हणवणारे खिंड सोडून पळाले, थोरात यांच्या राजीनाम्यावरून विखेंचा खोचक टोला
X

सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीनंतर काँग्रेसमधील खदखद बाहेर आली आहे. त्यातच काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले (Nana patole) यांच्याशी जमत नसल्याचे सांगत राजीनामा दिला आहे. त्यावरून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी खोचक टोला लगावला आहे.

२०१९ साली काँग्रेस वाचविण्यासाठी मी बाजीप्रभू देशपांडे (Bajiprabhu Deshpande) यांची भूमिका बजावणार, असे सांगणारे आता हतबल का झाले? खिंड लढवायची सोडून त्यांनी पळ काढण्यात समाधान मानले आहे, अशी उपरोधिक भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तसेच थोरात यांच्या भूमिकेवर विखे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

नाशिक (Nashik) पदवीधर विधानपरिषद निवडणूक निकालानंतर राज्यात विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यातील या घडामोडींबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्ष नेते पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठविण्याची भाषा करतात. त्यांचे प्रदेशाध्यक्षांशी जमत नाही म्हणून सांगतात. या बऱ्याच गोष्टींचे आश्चर्य वाटते. नाशिक पदवीधर मतदारसंघात महविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार होता आणि काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. पण काँग्रेसने (Congress) महविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी का प्रयत्न केला नाही? हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे, असे विखे पाटील म्हणाले.

काँग्रेसमध्ये देखील तुम्हाला कुणी विचारत नाही. तुम्ही देशातील अध्यक्षांकडे जाऊन भांडा किंवा महाराष्ट्राचे जे प्रभारी असतील त्यांच्याकडे जाऊन भांडा. पण पक्षाचा अंतर्गत वादाचा परिणाम महाविकास आघाडीवर झालेला आहे. त्याची जबाबदारी ते घेणार की नाही? हा महत्वाचा प्रश्न आहे, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला.

Updated : 7 Feb 2023 2:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top