Home > Politics > परमबीर सिंगांच्या लेटरबॉम्बमुळे भाजप नेते तोंडघशी

परमबीर सिंगांच्या लेटरबॉम्बमुळे भाजप नेते तोंडघशी

परमबीर सिंगांच्या लेटरबॉम्बमुळे भाजप नेते तोंडघशी
X

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग प्रकरणात आज नवीन ट्विस्ट आला आहे. शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात देशमुख यांच्याविरुद्ध पत्राच्या पलीकडे कोणताही पुरावा परमबीर यांच्याकडे नसल्याच समोर आलं आहे. त्यामुळे वसुली सरकार टॅगलाईन ठाकरे सरकारवर सतत आरोप करणारी भाजप आता तोंडघशी पडली आहे.

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी वसुली करण्याचे टार्गेट दिले असल्याचा आरोप त्यावेळचे मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला होता. विशेष म्हणजे याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सिंग यांनी ही माहिती दिली होती. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने देशमुख यांना आपल्या राजीनामा द्यावा लागला होता. विशेष म्हणजे त्यानंतर ही प्रत्येक वेळेस राज्य सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांवर टीका करताना वसुली सरकार असा खोचक टोला भाजप नेत्यांकडून लावला जायचा.

पण आता देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा आरोप करणाऱ्या परमवीर सिंग यांनीचं आपल्याकडे पत्राच्या पलीकडे कोणताही पुरावा नसल्याच चौकशी आयोगासमोर वकिलामार्फत आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यामुळे वसूली सरकार म्हणून टीका करणारे भाजप नेते तोंडघशी पडले आल्याची चर्चा आहे.

Updated : 3 Nov 2021 3:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top