Home > Politics > "वजन वाढलं की कमी करावं लागतं", पंकजा मुंडे यांचा टोला कुणाला?

"वजन वाढलं की कमी करावं लागतं", पंकजा मुंडे यांचा टोला कुणाला?

वजन वाढलं की कमी करावं लागतं, पंकजा मुंडे यांचा टोला कुणाला?
X

"करेक्शन ही एक कायम चालणारी प्रक्रिया असते, त्यामुळे पक्षातही असे करेक्शन होत असते, ज्याप्रमाणे आपण वजन वाढले की कमी करतो किंवा कमी झाले की वाढवतो, तशीच ही प्रक्रिया असते" असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पंकजा मुंडे यांनी भविष्यात पक्ष जनतेच्या सर्व प्रश्नांवर संघर्ष करणार असल्याची माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या पक्षात दुर्लक्षित केल्या गेलेल्या नेत्यांना चांगले पद आणि उमेदवारी दिली गेल्याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा करेक्शन ही कायम चालणारी प्रक्रिया असते, असे सांगत करेक्शन केले तर परफेक्शन येते, आपणही वजन वाढले तर कमी करतो, असे म्हणत त्यांनी विनोद तावडे यांचे अभिनंदन केले.

त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी बुलडाण्यात केलेल्या पदाबद्दलच्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा आधीच्या वक्त्यांच्या म्हणण्याचा संदर्भ घेऊन ते बोलते होते, त्याचा राजकीय अर्थ काढू नका, असेही त्यांनी सांगितले. पण आपल्याला कोणतीही अपेक्षा नसल्याचे म्हणत आपण जनतेसाठी काम करत राहू असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेत OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकारने घेतलेली भूमिका OBC च्या पाठीत खंजीर खुपसणारी आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर नवीन सरकारने जनहिताच्या मुद्दे मार्गी लावणे अपेक्षित होते पण झालेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Updated : 23 Nov 2021 9:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top