Home > Politics > "पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशीपोटी - कामकरी" ; नितेश राणे यांनी टीका

"पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशीपोटी - कामकरी" ; नितेश राणे यांनी टीका

पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशीपोटी - कामकरी ; नितेश राणे यांनी टीका
X

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.नितेश राणेंनी टि्वट करत आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. "पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशीपोटी - कामकरी" असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. तसेच बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा आहे, मात्र इथे सामान्य जनता महाविकास आघाडी सरकारने दिलेली सजा भोगत असल्याची टीका राणे यांनी केली केली आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर वर एक व्यंगचित्र देखील शेअर केले आहे.

या व्यंगचित्रात आदित्य ठाकरे हे विमानात बसलेले दाखवले आहेत. ते विमानातून खाली पाहात आहेत. तर खाली चार व्यक्ती दाखवण्यात आले आहेत, त्यामध्ये एक शेतकरी आहे, दुसरा एमपीएससीची तयारी करणारा विद्यार्थी , तर तिसरा व्यक्ती हा डॉक्टर असून, चौथा एसटी कर्मचारी आहे. या व्यंगचित्रात हे सर्वजण हात जोडून आपल्या समस्या सोडवण्याची विनंती करताना दाखविण्यात आले आहेत. तर आदित्य ठाकरे विमानातून परदेश वारीला निघालेले दाखवण्यात आले आहेत.

Updated : 16 Nov 2021 5:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top