Home > Politics > अनिल परब यांचा राजीनामा घ्या, किरीट सोमय्या यांची मागणी

अनिल परब यांचा राजीनामा घ्या, किरीट सोमय्या यांची मागणी

अनिल परब यांचा राजीनामा घ्या, किरीट सोमय्या यांची मागणी
X

ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अनिल परब यांची मंत्रिमंडलातून हकालपट्टी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. एकीकडे परब यांना EDने नोटीस बजावली आहे तर आता दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केला आहेत. अनिल परब यांनी बेकादेशीररित्या रिसॉर्ट बांधले आणि त्याचा मालमत्ता कर देखील भरला आहे, पण बेकायदेशीर काम करणाऱ्या परब यांना मुख्यमंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

अनिल परब यांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे आदेशही द्ले गेले असताना त्यांना मंत्रिमंडळात का ठेवले गेले आहे असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अनिल परब यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करण्याती मागणी सोमय्या यांनी केली आहे.

EDने परिवहनमंत्री अनिल परब यांना रविवारी नोटीस बजावली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात चौकशीसाठी परब यांना मंगळवारी EDच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन परब आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.अनिल परब यांच्या राजीनामा घ्या, किरीट सोमय्या यांची मागणी

Updated : 30 Aug 2021 10:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top