Home > Politics > 'हे सरकार म्हणजे अलीबाबा 40 चोर असंच आहे'- किरीट सोमय्या

'हे सरकार म्हणजे अलीबाबा 40 चोर असंच आहे'- किरीट सोमय्या

हे सरकार म्हणजे अलीबाबा 40 चोर असंच आहे- किरीट सोमय्या
X

पंढरपूर : 'हे सरकार म्हणजे अलीबाबा 40 चोर असंच आहे, या चोरांनी महाराष्ट्रात केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश राज्य राज्यभर फिरून भाजप करत आहे. हे आंदोलनच आम्ही हाती घेतले असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे ते पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले की, या घोटाळेबाज ठाकरे सरकारचे विसर्जन आम्ही करणारच! घोटाळे मुश्रीफ करणार आणि जेलमध्ये आम्हाला पाठवणार हे चालणार नाही. कोल्हापूर दौऱ्यावर जाताना मला अडवण्याचा प्रयत्न केला.यांच्या सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड जेलमध्ये जाऊन आले , माजी गृहमंत्री अनिल देशमुख फरार आहेत, अनिल परब यांचे अनधिकृत बांधकाम पडण्याचे आदेश देण्यात आले यापेक्षा कोणता पुरावा हवा आहे? असा सवाल करत त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

पवार कुटुंबाचे घोटाळे बाहेर येत आहे, अजित पवारांच्या बहिणींच्या घरी छापेमारी झाली तर यांनी रडण्याचे नाटक केले, आम्ही अजित पवारांच्या बहिणींच्या संपत्तीचे कागदपत्रं समोर आणले. पवार कुटुंब कसे खोटे बोलत आहे हे आम्ही दाखवून दिलं. पुणे जिल्ह्यात गेलं की लोक बोलतात सब भूमी पवार की. हे सर्व आम्ही बाहेर काढू असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.

शरद पवार म्हणाले 'त्या' दोन बिल्डर ने चोरी केली आहे,ते बिल्डर अजित पवारांचे पार्टनर निघाले. अजित पवारांनी जरेंडेश्वर कारखाना असाच पद्धतीने घेतला आहे, त्याचे रिपोर्ट न्यायालयाने मागवले आहेत ते रिपोर्ट न्यायालयात सादर केले जातील,असं सोमय्या यांनी म्हटले आहे.

Updated : 17 Oct 2021 1:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top