Home > Politics > राज्यात मुख्यमंत्री बदलले आहेत काय? चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना टोला

राज्यात मुख्यमंत्री बदलले आहेत काय? चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना टोला

राज्यात मुख्यमंत्री बदलले आहेत काय? चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना टोला
X

मुंबई : राज्यातील एस.टी कर्मचारी न्यायालयाच्या आदेशानंतरही आपल्या संपाच्या भूमिका कायम आहे. आता या मुद्द्यावरुन राज्याचं राजकारण तापत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. एस. टी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश मानावा आणि संप मागे घ्यावं असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. त्यावरून राज्याचे मुख्यमंत्री बदलले की काय? घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायची असते असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपावर न्यायालयाने भाष्य केलं असून कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा आदर करावा आणि संप मागे घ्यावा असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

आपल्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर सरकारने जर कारवाई केली तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरू असा इशारा देखील पाटील यांनी दिला. चंद्रकांत पाटील म्हणाले की, "कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने जनतेला आवळा दिला. सगळा निधी केंद्राने दिला. यांनी एक मास्क देखील विकत घेतला नाही. राज्य सरकार केवळ चेक हातात घेऊन फिरत होते."

दरम्यान इंधनाबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असेल तर आम्ही स्वागत करू. पण माझं चॅलेंज आहे हे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही असंही पाटील म्हणाले.

Updated : 6 Nov 2021 2:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top