Home > Politics > जनआशीर्वाद यात्रेवरुन संजय राऊत यांचा गंभीर आरोप

जनआशीर्वाद यात्रेवरुन संजय राऊत यांचा गंभीर आरोप

जनआशीर्वाद यात्रेवरुन संजय राऊत यांचा गंभीर आरोप
X

मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत, अशी टीका भाजप नेते करत असतात. या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. कोवीड काळात वर्क फ्रॉम होम ही काळाची गरज होती, पण तुम्ही उकीरडे फुंकत फिरलात, या शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची सध्या राज्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. पण यात्रेमुळे तिसऱ्या लाटेचा धोका आहे, असा गंभीर इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. जनआशीर्वाद यात्रेची काही गरज नसताना यात्रा काढली जाते आहे, त्यामुळे राज्यात कोरोनाचं संकट वाढणार आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

एका सर्वेक्षणानुसार टॉप ५ मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांचे नावंही आले आहे. महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांनी काय केले यावर विरोधकांनी यापूर्वी अनेकदा गाजावाजा केला, ढोल बडवले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या कामाची दखल घेतली गेली, असे राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री काम करत नाहीत, घरी बसतात अशी टीका केली, पण कोवीड काळात केलेल्या कामांची संपूर्ण जगाने नोंद घेतली, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Updated : 18 Aug 2021 8:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top