Home > Politics > जी 23 हा मोदी-शाह यांचा सापळा, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

जी 23 हा मोदी-शाह यांचा सापळा, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

जी 23 हा मोदी-शाह यांचा सापळा, नाना पटोले यांचा गंभीर आरोप
X

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना राहुल गांधी यांच्यावर काँग्रेसच्या दूरवस्थेचे खापर फोडले आहे. तसेत याआधी देखील ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. हे नेते काँग्रेसमधील नाराजांच्या जी 23 या गटातील नेते मानले जातात. दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनी देखील काँग्रेस पक्षातील सद्यस्थिती संदर्भात पक्ष नेतृत्वाकडे बोट दाखवलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.

भारत जोडो यात्रेच्या नियोजनासंदर्भात सोमवारी दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात दिल्लीत आले आहेत, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, "काँग्रेस पक्षामध्ये लोकशाही आहे. प्रत्येकाला मत ठेवण्याचा अधिकार आहे. भाजपामध्ये लोकशाही संपुष्टात आली आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांमधून भूमिका मांडल्याने पक्षाचं नुकसान होत आहे. त्यांनी आपली भूमिका पक्ष नेतृत्वासमोर भूमिका मांडावं, आपलं मत मांडताना सार्वजनिकरित्या भूमिका मांडू नये, अशी आमची भूमिका आहे. त्याचबरोबर काँग्रेसमधील जी २३ हा मोदी आणि शाहा यांचा ट्रॅप आहे" असा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून गुलाम नबी आझाद यांना कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना सर्व सेवा त्यांना पुरवल्या जात आहेत, पद्मश्री दिलं जातं. भाजपने काँग्रेसमध्ये जी २३ गट निर्माण करून केल्याचे यावरुन आता उघडकीस आलं आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे कन्याकुमारी ते काश्मीर पायी भारत जोडो यात्रा करणार आहेत. ही यात्रा महाराष्ट्रातूनही जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये १८ दिवस ही यात्रा महाराष्ट्रात असेल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. ही यात्रा 12 राज्यातून साडेतीन हजार किलोमीटर अंतर पार करणार आहे. तसंच ही यात्रा 150 दिवस चालणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान आगामी काळात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचं अध्यक्ष व्हावं, असे मतही पटोले यांनी व्यक्त केले.

Updated : 29 Aug 2022 1:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top