Home > Politics > भाजपची खेळी? फडणवीसांचे विधान आणि सत्यजित तांबेंची उमेदवारी

भाजपची खेळी? फडणवीसांचे विधान आणि सत्यजित तांबेंची उमेदवारी

भाजपची खेळी?  फडणवीसांचे विधान आणि सत्यजित तांबेंची उमेदवारी
X

महिनाभरापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक प्रकाश सोहळ्यात "सत्यजीत तांबे यांच्यासारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार, अशी लोक जास्त दिवस बाहेर ठेवली की आमची नजर त्यांच्याकडे जाते. आम्ही चांगली माणसं गोळा करत आहोत." असं विधान करून बुचकळ्यात टाकून नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत उमेदवार न देता सुधीर तांब्यांची माघार आणि सत्तेजित तांबेंची अपक्ष उमेदवारी हा भाजपचा गेम प्लॅन असल्याची चर्चा आहे.

नाशिकमधील पदवीधर मतदार संघात शेवटच्या काही तासांत मोठ्या घडामोडी घडल्या. या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट आला. सुधीर तांबे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता या मागे भाजप आहे का? ही चर्चा सुरु झाली आहे.

कारण महिन्याभरापुर्वी सत्यजित तांबे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्यांवर आपली नजर असल्याचे म्हटले होते. भाजपने इतर चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. फक्त अपवाद नाशिकचा आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये सुधीर तांबे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असतानाही सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे फडणवीस यांनी जे सांगितले, ते आता प्रत्यक्षात उतरणार आहे की काय? ही चर्चा आहे.

सत्यजीत यांच्या अपक्ष उमदेवारीमुळे काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक प्रकाश सोहळ्यातील विधान चर्चेत आता आले आहे. "सत्यजीत तांबे यांच्यासारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार, अशी लोक जास्त दिवस बाहेर ठेवली की आमची नजर त्यांच्याकडे जाते. आम्ही चांगली माणसं गोळा करत आहोत."

एकंदरीतच मागील काही दिवसांमध्ये राज्यसभा विधान परिषद निवडणूक मध्ये भाजपने कमी संख्याबळ असतानाही उमेदवार निवडून आणले होते.आता राज्यभरातील सर्व विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले असताना जाणीवपूर्वक नाशिकची जागा खाली ठेवली. सुधीर तांबेने उमेदवारी जाहीर होऊ नये उमेदवारी मागे घेणे आणि अपक्ष म्हणून 47 तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरणे हा एक भाजपाचा गेम प्लॅन असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Updated : 12 Jan 2023 1:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top