Home > Politics > उपमुख्यमंत्री पदावरही देवेंद्र फडणवीस समाधानी?

उपमुख्यमंत्री पदावरही देवेंद्र फडणवीस समाधानी?

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री अशी उलटी कारकीर्द सुरू झाल्याने फडणवीस नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान फडणवीस उपमुख्यमंत्री पदावरही समाधानी असल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे.

उपमुख्यमंत्री पदावरही देवेंद्र फडणवीस समाधानी?
X

भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असल्याचे जाहीर केले. यानंतर त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . हा निर्णय केंद्रातून झाल्याने भाजप नेत्यांनाही धक्का बसला होता .त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या आदेशाचे नेहमी काटेकोर पालन केले आहे ,भाजपचे ते खंदे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे पक्षाच्या निर्णयावर ते खुश असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे .

राज्यातील सत्तांतराच्या घडामोडींमध्ये भाजपचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते प्रत्यक्ष सहभागी होते .भाजपचे हे नेते सिकंदराबादमध्ये दाखल झाले आहेत . सिकंदराबाद मद्ये शुक्रवारपासून भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तीन दिवसांसाठी सुरु झाली आहे .३ आणि ४ जुलैला महाराष्ट्रातील शिंदे यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार असून त्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.त्यामुळे फडणवीस भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थित राहण्याची शक्यता नाही. मात्र, अधिकृतपणे भाजपने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.आता गोव्यात मुक्कामाला असणारे शिंदे समर्थक आमदार शनिवारी मुंबईत परतणार आहेत. या अधिवेशनाला उपस्थिती लावण्यासाठी शिंदे समर्थक आमदार येत आहेत .

बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला . त्यांनतर देवेंद्र फडणवीस यांचे जुने भाषण ''मी परत येईन.. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी!'' हे भाजपने ट्विट केले होते. ही ध्वनिचित्रफीत अजूनही महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर खात्यावर ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर भाजपचे नेते म्हणाले की, शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्णय योग्य आहे. शिंदे आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर एकमत आहे. जे पी नड्डा यांनी फोन केल्यांनतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं असल्याचंही भाजप नेत्यांनी सांगितलं आहे .

महाराष्ट्रातील सत्तांतरासंदर्भात शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे .उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत. हैदराबाद आणि सिकंदराबाद मध्ये दूरदृष्टी असलेल्या भाजप नेत्यांचे फलक लावले आहेत. गोलाकार मोठे असे फलक लावण्यात आले आहेत. या नेत्यांमध्ये राजनाथ सिंह ,योगी आदित्यनाथ ,अश्विनी वैष्णवी अनुराग ठाकूर यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचही छायाचित्र आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, अमित शहा,जे पी नड्डा यांच्या छायाचित्रांचा समावेश असलेले फलक सुद्धा लावण्यात आले आहेत.

Updated : 2 July 2022 6:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top