Home > Politics > भाजपची सत्ता असलेल्या राज्यात भाजपच्याच उमेदवाराचे डिपॉझिट जप्त

भाजपची सत्ता असलेल्या राज्यात भाजपच्याच उमेदवाराचे डिपॉझिट जप्त

भाजपची सत्ता असलेल्या राज्यात भाजपच्याच उमेदवाराचे डिपॉझिट  जप्त
X

देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालात केंद्रात सत्ता असलेल्या भाजपची चिंता वाढवणारे निकाल आले आहेत. महाराष्ट्रात नांदेडमधील देगलुर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव केला आहे. तर दादरा नगर हवेली इथल्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपला धूळ चारली आहे. शिवसेनेनं पहिल्यांदाच राज्याबाहेर विजय मिळवला आहे.

याहून धक्कादायक निकाल भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात लागले आहेत. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्बई यांचा जिल्हा असलेल्या हावेरीमध्ये भाजपच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आहे. बोम्बई मुख्यमंत्री झाल्यानंतरही ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यांच्या प्रतिष्ठेला हा धक्का लागला आहे.

तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशात तर लोकसभेच्या एका जागेसाठी आणि विधानसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये अर्की, फतेहपूर आणि जुबल कोटखाई या ठिकाणी झालेल्या विधानसभा पोचनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. भाजपसाठी चिंतेची बाब म्हणजे जुबल कोटखाईमध्ये तर भाजपच्या उमेदवाराला केवळ २६४४ मतं पडली आहेत, त्यामुळे त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. त्यामुळे या निकालांवरुन भाजपचे धडा घेण्याची गरज काही विरोधकांनी व्यक्त केली आहे.

Updated : 2021-11-03T09:02:53+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top