Home > Politics > ठाकरेंना मोठा धक्का, सुभाष देसाईंचे मुलगा शिंदे गटात प्रवेश करणार

ठाकरेंना मोठा धक्का, सुभाष देसाईंचे मुलगा शिंदे गटात प्रवेश करणार

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भूषण देसाई आज शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती आहे.

ठाकरेंना मोठा धक्का, सुभाष देसाईंचे मुलगा शिंदे गटात प्रवेश करणार
X

शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना चारही बाजूंनी कोंडीत टाकले. 40 आमदार फोडून पहिला धक्का दिला. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आले, त्यानंतर शिवसेनेने (Shiv Sena) पक्षाचा ताबा घेतला, त्यानंतर शिंदे यांना खरी शिवसेना मिळाली. अनेक नेत्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, ज्यात उद्धव ठाकरे यांच्याशी वर्षानुवर्षे एकनिष्ठ राहिलेल्यांचाही समावेश आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निष्ठावान आणि एकनिष्ठ असलेले सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणी सुरू केली आहे. त्यांचे जवळचे आणि विश्वासू सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई हे शिंदे यांच्या गटात सामील होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भूषण देसाई आज बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत. भूषण देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही शिवसेनेचे अनेक निष्ठावंत नेते शिंदे गटात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासमोरील आव्हाने अधिक खडतर होत असतानाच शिंदे गटाचा जनाधार दिवसेंदिवस वाढत आहे.

Updated : 13 March 2023 2:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top