Home > Politics > लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी टॉप फाइव्हमध्ये, कोण आहे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री?

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी टॉप फाइव्हमध्ये, कोण आहे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री?

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी टॉप फाइव्हमध्ये, कोण आहे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री?
X

इंडिया टुडेने केलेल्या सर्वेक्षणात भाजपला मोठा धक्का बसला आहे. सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या 11 नावांपैकी 9 नाव ही बिगर भाजप सरकारमधील असल्याचं समोर आलं आहे. लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांना केवळ 29% लोकांनी पाठिंबा दर्शविला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची नावे पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत आहेत.

द मूड ऑफ द नेशन ऑगस्ट 2021 चे सर्वेक्षण 10 जुलै ते 20 जुलै दरम्यान कार्वी इनसाइट्सद्वारे करण्यात आले होते. हा पोल देशातील 19 राज्यांमधील 115 संसदीय मतदारसंघ आणि 230 विधानसभा मतदारसंघात घेण्यात आला आहे.

सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या नावांमध्ये एमके स्टालिन हे पहिल्या क्रमांकावर आले आहेत. तर नवीन पटनायक यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आलं आहे. त्यांनतर, विजयन, उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी हे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. दरम्यान या यादीमध्ये भाजपचे हिमंत बिस्वा सरमा आणि योगी आदित्यनाथ हे दोनच चेहरे आहेत.

या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता एका वर्षात 66 टक्क्यांवरून 24 टक्क्यांवर आली आहे. या सर्व्हेक्षणात भारतासाठी पुढील पंतप्रधान कोण असावा? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात 24 टक्के लोकांनी मोदी यांना पंतप्रधान म्हणून पहिली पसंती दर्शवली होती. तर जानेवारी 2021 मध्ये मोदींना 38 टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून पसंती दर्शवली होती. त्याच वेळी, ऑगस्ट 2020 मध्ये 66 टक्के जनतेने मोदींना पंतप्रधान पदासाठी त्यांची पहिली पसंती असल्याचे म्हटलं होतं.

इकडे मोदींची लोकप्रियता जरी घटली असली तरी भारतीय जनता पक्षाच्या दोन नेत्यांची लोकप्रियता वाढली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि मोदी यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अमित शहा यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये सात टक्के लोकांनी त्यांना पंतप्रधानपदासाठी योग्य मानले आहेत. तर जानेवारी 2021 मध्ये हा आकडा आठ टक्के होता, तर ऑगस्ट 2020 मध्ये केवळ चार टक्के लोकांनी त्यांना पंतप्रधान म्हणून पसंती केले होते.

Updated : 17 Aug 2021 12:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top