Home > Politics > पुण्याचे नवे शिल्पकार कोण, देवेंद्र फडणवीस की अजित पवार?

पुण्याचे नवे शिल्पकार कोण, देवेंद्र फडणवीस की अजित पवार?

पुण्याचे नवे शिल्पकार कोण, देवेंद्र फडणवीस की अजित पवार?
X

राज्याचे दोन मोठे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी भल्या पहाटे महाराष्ट्राची झोप उडवली होती, हा इतिहास महाराष्ट्र कधी विसरणार नाही. पण त्यानंतर हे दोन्ही काही तासात वेगळे झाले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री तर फडणवीस विरोधी पक्षनेते झाले. आता हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करुन आपापल्या बाजू सांभाळत आहे. पण या दोन्ही दिग्गज नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 22 जुलै असतो. पण या दोन्ही नेत्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

या नेत्यांनी हा निर्णय़ घेतला असला तरी दोघांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या वाढदिवसावरुन पुण्यात राजकारण रंगले आहे. बॅनरबाजी न कऱण्याचे आवाहन या दोन्ही नेत्यांनी केले आहे. पण पुण्याचे विकासपुरूष कोण यावरुन आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये बॅनरयुद्ध सुरू झाले आहे.

पुण्यात सध्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मोठमोठे बॅनर्स लागल आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्याचे कार्य गेल्या काही वर्षात अजित पवार यांनी केले आहे, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. त्यामुळे पुण्याचे नवे शिल्पकार म्हणून अजित पवार यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. एकीकडे असे बॅनर लागले असताना देवेंद्र फडणवीस यांना नव्या पुण्याचे शिल्पकार म्हणत त्यांच्या समर्थकांनीही बॅनरबाजी केली आहे.

अजित पवार यांनी स्वतः जातीने लक्ष घालून मागील दशकात पुणे, पिंपरी चिंचवड परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे. आजचा पुण्याचा विकास हे गेल्या तीस वर्षाच्या अविरत कष्टाचं हे फळ आहे, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे पुण्याच्या विकासाचे शिल्पकार म्हणून पोस्टर शहरामध्ये लावलेले आहेत. देवेंद्र फडणवीस अशा जाहिराती करतात, पण ते पुण्यासारखा नागपूरचा विकास करू शकलेले नाहीत. याउलट पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, कारभारी म्हणून अजितदादांनी गेल्या दोन दशकात पुण्याचा चेहरा मोहरा बदलण्यात मोलाचे योगदान दिलेले आहे, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.

तर २०१७ साली पुणे महानगरपायालिकेवर भाजपाची सत्ता आल्यापासून अनेक लोकोपयोगी योजना पुणेकरांसाठी मनपाने राबविल्या आहेत. असा दावा भाजपचे नेते करतात. तसेच फडणवीस यांच्या काळातच पुण्यातील मेट्रोच्या कामाला गती मिळाली असा दावाही नेते करत आहेत.

Updated : 2021-07-20T16:16:39+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top