Home > Politics > बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं.हा देवेंद्र फडणवीसांच्या मनाचा मोठेपणा ... एकनाथ शिंदे .

बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं.हा देवेंद्र फडणवीसांच्या मनाचा मोठेपणा ... एकनाथ शिंदे .

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील,अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.यानुसार एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं.हा देवेंद्र फडणवीसांच्या मनाचा मोठेपणा ... एकनाथ शिंदे .
X'शिवसेना विधिमंडळ गट,भाजप आणि १६ अपक्ष असं मिळून एक मोठा गट तयार होईल आणि एकनाथ शिंदे गटाला समर्थन देईल आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील.'अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.यानुसार एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

या निर्णयावर बोलताना फडणवीस साहेबांनी १२० च संख्याबळ असतानाही जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचे म्हंटले आहे. तसेच मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी खूप आभारी असल्याचे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्याचबरोबर या संपूर्ण लढाईत जे ५० आमदार आपल्यासोबत लढले त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तसेच जे घडलं ते वास्तव आपल्यासमोर आहेत ज्या अपेक्षा आहेत,त्याही आपल्या समोरच आहेत .त्यामुळे या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र एक करू अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे .

महाविकास आघाडी सरकारसोबत असताना निर्णय घेता येत नव्हते त्यामुळे बाळासाहेबांची शिकवण आणि आनंद दिघे यांच्या विचरसरणीनुसार अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उठवला आहे ,या विश्वासाला तडा माझ्याकडून जाणार नाही .एक मजबूत सरकार आम्ही देऊ. अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच राज्याबरोबर केंद्रातील सरकारची ताकद उभी असेल तर ते सरकार मजबूत असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे .


Updated : 30 Jun 2022 12:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top